33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeइलेक्ट्रोनिक्सXiaomi चा नवीन स्मार्ट Water प्युरीफायर कसा आहे ?

Xiaomi चा नवीन स्मार्ट Water प्युरीफायर कसा आहे ?

Xiaomi ने आपल्या Smarter Living २०२० या इव्हेंट मध्ये आपल्या अनेक नव्या प्रोडक्ट्स बद्दल खुलासा केला आहे. या इव्हेंट मध्ये कंपनीने आपल्या नव्या स्मार्ट वियरेबल Mi Band ४ आणि आपल्या नव्या टीव्ही रेंज सहित water प्युरीफायर लॉन्च केला आहे. हा water प्युरीफायर नॉर्मल नसून स्मार्ट water प्युरीफायर आहे. चला तर, आता या नव्या Mi स्मार्ट water प्युरीफायर ची माहिती घेऊया.

Mi स्मार्ट प्युरीफायर वापर पद्धती

हा स्मार्ट water प्युरीफायर पाण्याला प्युरीफाय करण्यासाठी पाच स्टेप प्रोसेसचा वापर करतो आणि म्हणूनच या प्रोसेसला पेंटा प्युरीफीकेशन प्रोसेस म्हटले जाते. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये या प्युरीफायर मध्ये असलेले PP+ activated कार्बन फिल्टर मोठ्या आणि डोळ्याला दिसणाऱ्या कणांना फिल्टर करतात आणि पाण्यातील क्लोरीन, रंग आणि दुर्गंधीला कमी करतात. तिसऱ्या स्टेजमध्ये यात असलेले RO फिल्टर धातूच्या मोठ्या कणांना काढून टाकतात. यानंतर चौथ्या स्टेजमध्ये प्युरीफायर मध्ये असलेले PAC फिल्टर उरलेले पदार्थ आणि दुर्गंधीला काढून टाकतात आणि पाण्याची चव चांगली राहण्यासाठी प्रयत्न करतात. शेवटच्या स्टेजमध्ये यातील UV लाईट पाण्यातील बक्टेरिया किंवा व्हायरसला मारून टाकतात आणि शेवटी कंपनीच्या दाव्यानुसार हा प्युरीफायर ९९.९९% शुद्ध पाण्याचं आऊटपुट देतो. म्हणजेच यातील ३ कार्टरेजेज – PAC, RO आणि UV हे महत्वाची भूमिका बजावतात.

हा प्युरीफायर Internet of Things (IoT) इकोसिस्टीमचा एक भाग आहे. म्हणूनच हा स्मार्ट capability सह येतो. कंपनीच्या Mi Home app च्या मदतीने तुम्ही या प्युरीफायरच्या tank मध्ये असलेल्या पाण्याची पातळी चेक करू शकता. याशिवाय या app च्या माध्यमातून पाण्याची TDS लेव्हल चेक करू शकता आणि यात असलेल्या प्रत्येक फिल्टरचे रियल-टाइम आयुष्य सुद्द्धा track करू शकता. जर फिल्टर खराब झाला असेल तर टो तुम्ही स्वतः खरेदी करून बदलू शकता म्हणजेच यासाठी कुठल्या टेकनीशीअनची गरज नाही. app च्या माध्यमातून पाण्य्ची क्वालिटी चेक करता येईल आणि अनेक स्टेट्स मध्ये पाणी बघतही येईल.

तसेच Mi स्मार्ट water प्युरीफायर चे वैशिष्ट्य म्हणजे त्याची DIY capability आहे. या प्युरीफायर मधील फिल्टरला युजर केवळ ३० सेकंदात रिप्लेस करू शकतो. यामुळेच युजरचे वार्षिक मेंटेनन्स चे पैसे वाचू शकतात.

या Mi स्मार्ट water प्युरीफायर चे डिझाईन अतिशय उत्तम आहे आणि हे डिझाईन पाहता कंपनीने घेतलेली मेहनत दिसून येते. अतिशय compact साईझ असलेल्या या प्युरीफायर मध्ये केवळ २ बटणे दिलेली आहेत. यात ७ लिटरचा tank दिलेला असून तो FAD अपृव्ह्ड मटेरीअल पासून तयार केलेला आहे. RO + UV हे वैशिष्ट्य असलेला हा प्युरीफायर मोबाईलला कनेक्ट करता येत असल्यामुळे युजर चे काम अगदी सोप्पे झाले आहे.

किंमत आणि उपलब्धता –

Xiaomi चा हा नवा Mi स्मार्ट water प्युरीफायर भारतात ११९९९/- रुपये किंमतीत लॉन्च केला गेला आहे. २९ सप्टेंबर पासून याच्या विक्रीला सुरवात झाली आहे. ग्राहक फ्लिपकार्ट, Mi.com, आणि Mi Home store वरून खरेदी करू शकतात.

Best Buy Link :

https://www.mi.com/in/mi-smart-water-purifier/

याची रियल टाइम मॉनिटरिंग सिस्टम खास आहे. यामुळे तुम्ही या वॉटर प्यूरीफायर द्वारा शुद्ध केलेल्या पाण्याला चेक करू शकता. यात अनेक सेन्सर्स चा वापर केलेला आहे. अशा प्रकारे कंपनीने स्मार्ट वियरेबल Mi Band ४ आणि नव्या टीव्ही रेंज सहित लॉन्च केलेल्या water प्युरीफायरची अनेक वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular