33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeइलेक्ट्रोनिक्सXiaomi Mi Motion Activated Night Light 2 भारतात ५९९/- रुपयात.

Xiaomi Mi Motion Activated Night Light 2 भारतात ५९९/- रुपयात.

Xiaomi Mi Motion Activated Night Light 2

हे डिव्हाइस आपल्या मोशन ला ओळखून स्वताच सुरु होते. यामध्ये २ लेव्हलचा ब्राईटनेस आहे आणि सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे यात असलेल ३६० डिग्री रोटेशन.

Xiaomi ने Mi Motion Activated Night Light 2 ला भारतात लौंच केला आहे. बेंगळूरू शहरात आयोजित केलेल्या Smarter Living 2020 या इव्हेंट मध्ये हे लौन्चींग पार पडलं. हे उपकरण शाओमी च्या क्राऊडफंडिंग या campaign च्या नावाखाली लौंच झाले आहे. Mi Motion Activated Night Light 2 हे नवे product आधीच्या Mi Water TDS tester, rechargeable LED lamp, LED स्मार्ट बल्ब, Truck Builder, Mi sunglasses, Mi मेन्स स्पोर्ट शूज, Mi selfie stick tripod black आणि bluetooth audio receiver white या साऱ्या उपकरणांसारखंचं आहे.

Mi Motion Activated Night Light 2: क्राऊडफंडिंग आणि किंमत

Xiaomi Mi Motion Activated Night Light 2 हा आपल्या घराला स्मार्ट होम बनवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे या उपकरणामुळे आता आपलं घरही स्मार्ट होणार आहे. हे डीव्हाइस स्वताच्या मोशनला ओळखून स्वताच सुरु होऊ शकते. २ लेव्हल ब्राईटनेस आणि ३६० डीग्री रोटेशन या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल हे डीव्हाइस तीन AA batteries च्या मदतीने काम करते. परंतु कंपनीने या batteries ना बॉक्स मध्ये समाविष्ट केलेलं नाही. याच्या product लिस्टिंग पेज वर एकूण ५०० युनिट्स चं क्राऊडफंडिंग ठरवलं गेल आहे.

Night Light 2 एडजस्टेबल ड्युअल ब्राईटनेस सह येतो. याचा हाय ब्राईटनेस लेव्हल २५ ल्युमंस तयार करतो तसेच याचा लो ब्राईटनेस लेव्हल ४ ल्युमंससह येतो. Night Light 2 हा २८०० K वार्म यलो लाईट सह येतो. याला अशा प्रकारे डिझाईन केलं गेलं आहे की ज्यामुळे हा बेडरूम मध्ये फिट होऊ शकेल. यात फोटो सेन्सिटिव्ह आणि ह्युमन body ड्युअल सेन्सर आहे. हेमिस्पेरिकल lamp ३६० देग्री ला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi Motion Activated Night Light 2 specs

ही १८ सप्टेंबर ला १२ वाजता सुरु झालेली क्राऊडफंडिंग ९ दिवस सुरु राहिली आणि २५ ऑक्टोबर पासून विक्री सुरु झाली. क्राऊडफंडिंग घेतलेल्या ग्राहकांना हे डीव्हाइस ५००/- रुपयात मिळेल. तसेच बाकीच्यांसाठी याची किंमत ५९९/- इतकी राहील. product च्या description मध्ये कंपनीने लिहिलं आहे की हा बल्ब डीम लाईट म्हणजेच कमी प्रकाशातही आपल्या मोशन ला ओळखू शकेल. हा लाईट कोणत्याही प्रकारच्या मोशनला न ओळखू शकल्यास १५ सेकंदात स्वताहून बंद होईल.

शाओमी च्या इतक्या साऱ्या products लौन्चींग नंतर हे सिद्ध झालाय की कंपनी आपला व्यापार केवळ स्मार्ट फोन पर्यंत मर्यादित ठेवू इच्छित नाही. कंपनी आपल्या व्यापाराला laptop, स्मार्ट टीव्ही पासून ते अगदी घरातल्या सगळ्या आवश्यक सामानापर्यंत पोहोचवू इच्छिते. आता लोकांना शाओमी चे हे नवे वैविध्यपूर्ण products आवडतात का हे बघण हा चर्चेचा विषय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular