Xiaomi MI band 4 हा खूप मोठा अपग्रेड भारतात लौंच झाला आहे. कलर डिस्प्ले हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या bandसोबत चार्जिंग tray आणि USB केबल संलग्नपणे देण्यात आली आहे. MI band 3 पेक्षा MI band 4 ची स्क्रीन मोठी आणि विड्थ कमी आहे. याचा सरफेस थोडा कर्व्हड आहे पण MI band 3 पेक्षा खूपच कमी. पहिल्यांदा पेअर केल्यानंतर तुम्हाला एक अपडेट मेसेज मिळेल टो नक्की अपडेट करा. याच वजन २२ ग्राम इतकं कमी आहे ज्यामुळे हा हातावर बांधल्यावर खूप हलका भासेल.
यावर तुम्ही हार्ट रेत सेन्सर टेस्ट घेऊ शकता. १ मिनिटाला मिळणारे तुमचे हार्ट बिट्स MI band 4 दाखवतो. टच responce उत्तम आहे शिवाय ब्राईट असल्यामुळे स्क्रीन वरचे सगळे कलर्स नीट दिसतात. याला ०.९५ इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. MI band 3ची स्क्रीन ०.७८ इंचाची होती म्हणजेच MI band 4 ची स्क्रीन २० ते २५ टक्क्यांनी मोठी आहे. यात NFC Variant सुद्धा येतो पण काही band मध्ये टो वापरला जात नाही. Proximity sensor , accelerometer 3 axes gyroscope हे ३ वेगवेगळे सेन्सर यात येतात. यात १३५ मिली Ah ची battery देण्यात आली आहे आणि Xiaomi चा असा दावा आहे कि एका चार्जिंगवर २० दिवसांपर्यंत ही battery टिकू शकते. MI band 4 हा तुम्ही स्विमिंग करतानासुद्धा वापरू शकता कारण हा water resistant आहे. मोबाईल वरील app वापरून तुम्ही watch फेस बदलू शकता. app मधील अनेक पर्यायांमधून तुम्ही निवडू शकता.
अलार्म , टाईमर , stop watch , स्टेप counter , हार्ट रेट counter , weather अशी अनेकविध फिचर्स यात समाविष्ट आहेत. मोबाईलवरील नोटिफिकेशन तुम्ही यावर बघू शकता. शिवाय find my device वापरून तुमचा हरवलेला मोबाईल शोधता येऊ शकेल. चीन मध्ये या MI band 4 ची किंमत १६९ UN (१७०० ते १८०० भारतीय रुपये )इतकी आहे ज्यात NFC Variant नाही. NFC Variant समाविष्ट असलेल व्हर्जन चीनी बाजारात २२९ UN(२३०० ते २४०० भारतीय रुपये )इतकी आहे. भारतीय बाजारात याची किंमत साधारणपणे २२९९ रुपयांपर्यंत असू शकते.
अशा प्रकारे अनेक वैशिष्ट्य असलेला हा MI band 4 चर्चेचा विषय ठरत आहे आणि कमी वेळात लोकप्रिय सुद्धा होत आहे. शाओमी MI Band 4 पुढचा चा फ्ल्येश सेल २८ सप्टेंबरला MI च्या साईटवर आहे आपण तिथून हा Band विकत घेऊ शकता.