चालू वर्ष संपायला निव्वळ काही दिवस शिल्लक असून, सरत्या वर्षाला निरोप देत कंपनी ग्राहकांसाठी अॅनिमेटेड इमोजीचे अनोखे सरप्राईज देणार आहे. अॅड्रॉइड आणि आयएसओ या दोन्ही सिस्टमच्या ग्राहकांना लवकरच अॅनिमेटेड आणि नवनवीन इमोजीचा आनंद घेता येणार आहे. व्हॉट्सअॅप वेबसाठी हा फिचर्स यापुर्वीपासून प्रदान करण्यात आला आहे.
सर्वजण सोशल मिडीयावर नवीन काही अपडेट होत आहे का त्याकडे लक्ष ठेवूनच असतात. सोशल मीडिया अॅप्सने आत्ता ग्राहकांसाठी नवीन फिचर्स तयार केले असून, सध्या त्याची ट्रायल टेस्टिंग सुरू आहे. यावर्षी कंपनीला त्या वादग्रस्त नव्या पॉलिसीमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. आपला तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने यावर्षी अनेक नवीन फिचर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिले आहेत.
कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सध्या कंपनी आणि डेव्हलपर्स विविध रंगांच्या हार्ट इमोजीवर काम करत आहेत. सध्याच्या घडीला फक्त धडकणारा लाल रंगाचा हार्ट इमोजी पाहायला मिळतो. मात्र या नव्या अपडेटनंतर मात्र विविध कलरफुल रंगाचे हार्ट इमोजीचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे.
नुकतेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मल्टी-डिव्हाइस फिचर्स सुद्धा लॉन्च केले आहे. ज्यामध्ये एक नंबरचे व्हॉट्सअॅप चार ठिकाणी वापरता येणे शक्य होणार आहे. या फिचर्सला आपण कॉम्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये देखील सोयीस्कररित्या वापरू शकणार आहोत.
या फिचर्सच्या मदतीने, सहभागी जोडण्यासाठी संपूर्ण ग्रुप कॉल रिस्टार्ट करण्याची गरज भासत नाही. ज्यांना आधीच सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील करायचे किंवा व्हायचे आहे, ते कॉलमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअॅप कॉल लॉगवर जाऊन करू शकतात. यासाठी, तुम्हाला कॉल डिटेल स्क्रीन ओपन करावी लागेल आणि नंतर सामील होण्यासाठी जॉइन पर्यायावर टच करावे लागेल. अशाप्रकारे, व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांसाठी इमोजीची सरप्राईज दिले आहे.