चायनीज कंपनी विवोने विवो V१७ प्रो हा आपला नवा स्मार्टफोन भारतात लौंच केला आहे. लौंचच्या आधीच या स्मार्टफोनची किंमत लिक झाली होती. लिक रिपोर्टमध्ये असं म्हटलं होत कि या फोनची किंमत जवळजवळ २७९९९/-($३९७)रुपये असेल. विवो V१७ प्रो हा स्मार्टफोन Dual pop-up सेल्फी कॅमेरा असणारा जगातला पहिला मोबाईल आहे. म्हणजेच या मोबाईल मध्ये सेल्फी साठी २ कॅमेरे असतील. फोनच्या मागील बाजूस Quad कॅमेरा सेट अप दिलेला आहे. फोनच्या मागील बाजूस असलेला मेन कॅमेरा ४८ मेगा पिक्सलचा आहे.
विवो V१७ प्रो हा स्मार्ट फोन स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ६७५ ऑक्टा कोअर प्रोसेसरसह आहे. हा फोन Android ९ pie वर आधरित customized ओएस वर चालेल. या फोनमध्ये टाइप सी चार्जिंगसह ४१०० एमएएच ची battery आहे. या स्मार्ट फोनला ६.४४ इंचाची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड स्क्रीन आहे तसेच १०८० X २४०० पिक्सल रेजोल्यूशन आहे. १५९.०० X ७४.७० X ९.८० मिमिही या फोन ची डायमेन्शन्स असून या फोन चं वजन २०२ ग्राम इतक आहे. याशिवाय ८ जिबी RAM आणि १२८ जिबी इंटरनल स्टोरेज हि या मोबाईल ची वैशिष्ट्य आहेत. मिडनाइट ओशन आणि ग्लेसिअर आईस या दोन रंगात हा मोबाईल उपलब्ध आहे.
या फोनचं भारतातील लौन्चींग २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिल्लीला एका शानदार कार्यक्रमात झाले. कंपनीच्या सोशल मिडिया platformवर या स्मार्ट फोन चं लाइव्ह लौन्चींग दाखवलं गेल. यामध्ये फेसबुक, युट्युब आणि ट्विटर इ. चा समावेश आहे.
या फोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सलच्या कॅमेरा शिवाय ८ मेगा पिक्सल ची वाइड angle लेन्स , २ मेगा पिक्सल चा बोके मोड आणि १३ मेगा पिक्सलची टेलीफोटो २ लेन्स दिलेली आहे. विवो V१७ प्रोमध्ये ब्लूटूथ व्हर्जन ५.०, वाय-फाय, Duel सिम सपोर्ट आणि USB ३.१ एनेबल्ड टाइप सी पोर्ट कनेक्टीव्हीटी ऑप्शनच्या रुपात दिलेला आहे. या स्मार्ट फोन मध्ये फेशिअल अनलॉकचा पर्यायही उपलब्ध आहे. तसेच या फोन मध्ये इन-डिस्प्ले- फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा दिलेला आहे.
विवो V१७ प्रो चा ८ जिबी RAM + १२८ जिबी स्टोरेज वेरीअंट भारतात २९९९०/- रुपये या किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन लौंच होऊन दहा दिवस उलटून गेलेत , तर मग आता त्वरा करा !