33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeटेलीकॉमरिलायंस जिओ साठी आता द्यावा लागणार एक्स्ट्रा चार्ज...

रिलायंस जिओ साठी आता द्यावा लागणार एक्स्ट्रा चार्ज…

दूरसंचार कंपनी रिलायंस जिओ (Reliance Jio) १० ऑक्टोबर म्हणजेच गुरुवार पासून बाकीच्या नेटवर्क वर कॉलिंग साठी चार्ज वसूल करणार आहे. आता जिओ यूजर्स ना दुसऱ्या टेलीकॉम कंपनी च्या नंबर वर संपर्क साधण्यासाठी ६ पैसे प्रति मिनीट इतका दर द्यावा लागेल. याबरोबरच जिओ ते जिओ च्या नेटवर्क वरील कॉल पहिल्याप्रमाणेच शुल्क मुक्त असेल. तसेच जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीचा फायदा देण्यासाठी टॉकटाइम पॅक च्या व्यतिरीक्त जास्तीचा डाटा देणार आहे.

२०१६ नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे की जिओ च्या ग्राहकांना कॉलिंग साठी पैसे भरावे लागणार आहेत. परंतु कंपनीने आपल्या ग्राहकांना अशी खात्री दिली आहे की आउटगोइंग ऑफ नेट कॉल वर ६ पैसे प्रति मिनीट इतके शुल्क फक्त तोपर्यंत द्यावे लागेल, जोपर्यंत TRAI आपल्या वर्तमान रेगुलेशन च्या नुसार इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस म्हणजेच IUC ला नष्ट करत नाही.

जिओ ने बाकीच्या कंपन्यांच्या नंबर वर कॉलिंग करण्यासाठी चार्ज लावायचे ठरवले आहे कारण रेग्युलेटरी पॉलिसी मध्ये बदल झाला आहे. युजर्सना एअरटेल आणि वोडा आयडिया नेटवर्क वर कॉल करण्यासाठी हा चार्ज भरावा लागेल. तसेच ग्राहकांना इंटरनेट आणि एसएमएस ची फ्री सुविधा आधीप्रमाणेच मोफत मिळेल.

रिलायंस जिओ ने असे जाहीर केले आहे की त्यांच्या ग्राहकांना लाईफ टाइम साठी फ्री कॉलिंग ची सुविधा दिली जाईल. परंतु युजर्स ना आउटगोइंग ऑफ नेट कॉल वर ६ पैसे प्रति मिनीट इतके शुल्क फक्त तोपर्यंत द्यावे लागेल, जोपर्यंत TRAI आपल्या वर्तमान रेगुलेशन च्या नुसार इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस म्हणजेच IUC ला नष्ट करत नाही. TRAI च्या शेवटच्या निर्णयानुसार ग्राहकांना वर्षाच्या अखेरीपर्यंत कॉल वर लागणाऱ्या IUC प्रमाणे ६ पैसे प्रती मिनिट इतके शुल्क द्यावे लागेल. १ जानेवारी २०२० पासून जिओ वरील IUC संपुष्टात येईल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच फक्त २ महिन्यांसाठी ग्राहकांना चार्जेस द्यावे लागतील.

जिओ ने १० रुपयांपासून ते अगदी १०० रुपयांपर्यंत top up व्हाऊचर्स जाहीर केली आहेत. १० रुपयाच्या प्लानमध्ये दुसऱ्या नंबर वर १२४ मिनिटे कॉलिंग करता येईल तसेच १ जिबी डाटा मिळेल. २० रुपयाच्या प्लान मध्ये २४९ मिनिटे / २ जिबी डाटा, ५० रुपयाच्या प्लान मध्ये ६५६ मिनिटे / ५ जिबीडाटा आणि १०० रुपयाच्या प्लानमध्ये १३६२ मिनिटांच्या कॉलिंगच्या सुविधेसह १० जिबी डाटा देण्यात आला आहे.

जिओ च्या पोस्टपेड प्लान असणाऱ्या ग्राहकांच्या बिलमधून ऑफ नेट कॉल नुसार ६ पैसे प्रती मिनिट च्या दराने वसुली केली जाईल. याचा अर्थ असा की पोस्टपेड वापरणाऱ्या ग्राहकांना सुद्धा ६ पैसे प्रती मिनिट इतका चार्ज कॉलिंग साठी द्यावा लागेल. तसेच प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांना जास्तीचा डाटा देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular