भारतात ९ ओक्टोबरला झाला लौंच…
चायनीज कंपनी शाओमी (Xiaomi)ने आपला आणखी १ स्मार्ट फोन भारतात लौंच केला आहे. या फोनची घोषणा झाली तेव्हाच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एक टीझर इमेज शेअर केली होती. शाओमीने गेल्या महिन्यात रेडमी ८ A लॉन्च केला होता जो रेडमी ७ A चा अपग्रेडेड वर्जन होता. एंट्री लेव्हल ८ A च्या लौन्चींग दरम्यान कंपनीने जाहीर केले होते की पुढील इव्हेंट मध्ये रेडमी ८ चं लौन्चींग होईल. battery आणि कॅमेराच्या बाबतीत हा फोन दमदार असेल असे संकेत कंपनीने आधीच दिले होते. रेडमी ८ फोनच्या मागे glossy प्लास्टिक सारख फिनिश आहे. ड्युअल कॅमेरा सेट अप हे आणखी एक वैशिष्ट्य या फोन मध्ये आहे. फोनच्या रिअर मध्ये फिंगर प्रिंट scanner देखील आहे.
रेडमी ८ या स्मार्ट फोनमध्ये वॉटर drop style नॉचं डिझाईनसह नवा डिस्प्ले आहे. सोबत USB टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या मागे २ कॅमेरे आहेत. तसेच LED flash लाइटसह १२ मेगापिक्सलचा मुख्य आणि ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकेल. शाओमी लवकरच भारतात रेडमी नोट ८ देखील लौंच करणार आहे. हा स्मार्ट फोन अलीकडेच चीन मध्ये लौंच झाला आहे. चीन मध्ये रेडमी नोट ८ ची किंमत ९९९ युआन म्हणजेच सुमारे १००००/- रुपयांपासून सुरु होईल असा अंदाज वर्तवण्यात आल आहे. रेडमी नोट ८ प्रो ची किंमत १३९९/- युआन म्हणजेच सुमारे १४०००/- रुपये आहे. काल कंपनीने रेडमी ७ चा अपग्रेडेड वर्जन रेडमी ८ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. शाओमीने या लॉन्च इवेंट मध्ये माहिती दिली आहे की रेडमी नोट ८ भारतात १६ ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल.
किंमत आणि उपलब्धता
रेडमी ८ कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. याच्या ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९९९/- रुपये आणि ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजची किंमत ८९९९/- रुपये आहे. फोन १२ ऑक्टोबरला mi.com सह फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.
स्पेसिफिकेशन्स
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात ७२०×१५२० पिक्सल रेजोल्यूशन सह ६.२१ इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीन मध्ये १९:९ के आस्पेक्ट रेशो आहे, जिची पिक्सल डेंसिटी ३२०ppi आहे. तसेच फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ ने प्रोटेक्टेड आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन ४३९ चिपसेट दिला आहे.
रेडमी दोन वेरियंट ३ जीबी + ३२ जीबी आणि ४ जीबी + ६४ जीबी मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन माइक्रो एसडी कार्ड सपॉर्ट सह येतो. माइक्रो एसडी कार्डने फोन मेमरी ५१२ जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर AI कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्राइमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे, ज्यात सोनी IMX३६३ चा सेंसर एफ/१.८ अपर्चर आणि दूसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी साठी फोन मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर फोन एंड्रॉयड ९ पाय वर बेस्ड MIUI १०.०.१.३ वर चालतो. फोन मध्ये पावर देण्यासाठी यात ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जो १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॉक्स मध्ये १० वॉट चार्जर दिला जाईल. फोन मध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग देण्यात आली आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.
अशा प्रकारे आता रेडमी ८ ची प्रतीक्षा संपली आहे. रेडमी नोट ८ प्रो ची वाट ही जास्त वेळ बघावी लागणार नाही. कंपनी लवकरच हा मोबाईल ही घेऊन येत आहे. अनेक वैशिष्ट्य असलेले हे रेडमी चे नवे स्मार्ट फोन्स आल्यामुळे रिअलमी चा धोका वाढला आहे त्यामुळेच मार्केट मध्ये नवी स्पर्धा अनुभवता येणार आहे.