28 C
Mumbai
Friday, February 3, 2023
Homeटेलीकॉमडिलीट केलेलं चॅट परत मिळविण्यास कायद्यात तरतूद

डिलीट केलेलं चॅट परत मिळविण्यास कायद्यात तरतूद

सरकारी यंत्रणांनी सोशल मीडियाला सांगून ठेवलेलं असतं की, आम्हाला तपासासाठी जर काही डिलीट केलेल्या गोष्टी लागल्या तर तुमच्याकडे अशी कार्यप्रणाली पाहिजे की ज्यातून आम्ही त्या परत मिळवू शकलो पाहिजे.

सोशल मिडीयामध्ये व्हॉट्सएप हे जगभरामध्ये जास्तीत जास्त वापरले जाते. व्हॉट्सएपमध्ये एखादा मेसेज हा एका युजरकडून जेव्हा दुसऱ्या युजरला सेंड होतो तेव्हा तो सेंड होताना तो मेसेज दुसरं कुणी वाचू शकण्याची शक्यता तशी कमी असते. पण काही वेळा हे चॅट व्हॉट्सएपच्या मधून जरी तुम्हा डिलीट केले तरीही ते फोनच्या मेमरीमधून किंवा व्हॉट्सएपच्या डेटाबेस फाईलमधून रिट्रीव्ह करता येते. आपण बऱ्याचवेळा व्हॉट्सएप चॅट डिलीट करतो. मात्र, ते परत कसे मिळवायचे? या बद्दल माहिती पाहू. डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी बाजारात बरीच सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्याला डिजीटल सॉफ्टवेअर किंवा डेटा रिट्रिव्ह करण्याचं सॉफ्टवेअर म्हणतात. एंड्राइड, आयओएस, विंडोज, लिनक्स अशा विविध ओपरेटींग सिस्टिमसाठी हे सॉफ्टवेअर मिळतात. यामधून चॅट्स रिट्रीव्ह करता येतात. चॅट्स डेटा कशासाठी रिट्रिव्ह करायचे आहेत, तो उद्देश महत्त्वाचा ठरतो.

कायदेशीर प्रक्रियेसाठी जर हे चॅट्स हवे असतील तर ते मिळवणे शक्य आहे. त्याला कोर्टाची परवानगी घेऊन हे करता येऊ शकतं. ज्याचा मोबाईल किंवा चॅट्स डेटा आहे त्याच्या परवानगी शिवाय किंवा कोर्टाच्या आदेशा शिवाय असं करणं बेकायदेशीर ठरू शकतं. हा एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे. सरकारी यंत्रणांनी सोशल मीडियाला सांगून ठेवलेलं असतं की, आम्हाला तपासासाठी जर काही डिलीट केलेल्या गोष्टी लागल्या तर तुमच्याकडे अशी कार्यप्रणाली पाहिजे की ज्यातून आम्ही त्या परत मिळवू शकलो पाहिजे.

आपण जो फोन किंवा कॉम्प्यूटर वापरतो त्यामध्ये दोन प्रकारचे यूजर राईट्स असतात. पहिला एडमिनिस्ट्रेटर आणि दुसरा युजर राईट असतो. एडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा रुट राईट्स जर मिळाले तर डिलीट केलेले चॅट्स परत मिळवणं खूप सोपं आहे. व्हॉट्सएप चॅट जरी फोन मधून डिलीट झाले पण त्यांचा जर गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतला असेल तर ड्राईव्हवरुन ते परत मिळवणं तेवढंच सोपं आहे. तपास यंत्रणा असतात त्या एकतर फोनला फिजीकली एक्सेस करुन हे चॅट्स मिळवतात किंवा त्या यूजरशी जे जोडलेले अकाऊंट असते त्यातून ते हे चॅट्स परत मिळवू शकतात. एखाद्या व्यक्ती सोबतचं चॅट हे त्या आपल्या फोनवरुन त्या चॅट विन्डोमधून डिलीट होतं. पण ते चॅट व्हॉट्सएपच्या डेटाबेसमधून डिलीट व्हायला वेळ लागतो. काल एखादा चॅट डिलीट केला असेल तर तो परवाच्या डेटाबेसमध्ये सापडतो. व्हॉट्सअपचं एक डेटाबेस फाईल तयार करतं. ती फाईल सेव्ह करतं. परंतु एखादा टेक्नोसेव्ही युजर ही डेटाबेस फाईल तयार होण्याआधीच ते चॅट डीलीट करतो. त्यामुळे काही वेळेला डिलीट केलेला डेटा मिळणे कठीण होऊन जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular