33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeइलेक्ट्रोनिक्सरियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन आणि रियलमी पॉवर बँक झाली लौंच...

रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन आणि रियलमी पॉवर बँक झाली लौंच…

ओप्पोचा सब ब्रांड असलेल्या रियलमीने भारतात आपल्या ६४ मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरच्या रियलमी XT स्मार्ट फोनला लौंच केले आहे. रियलमी XT सोबतच १०००० एमएएच battery असलेल्या रियलमी power बँक आणि रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोनसुद्द्धा लौंच झाले आहेत. Neckband स्टाइलच्या वायरलेस हेडफोनला splash resistance साठी IPS४ रेटिंग प्राप्त आहे. असं म्हटलं जातंय की रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन एक चार्जमध्ये १२ तासांपर्यंत playback प्रदान करू शकतो. रियलमी बड्स वायरलेस magnetic कंट्रोल फिचरसह सज्ज आहे.

realme wireless magnetic

रियलमी बड्स वायरलेस-

रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन ११.२ एमएम बस बुस्ट ड्राईवर्सने परिपूर्ण आहे. केवळ एक वेळ चार्ज करून हा १२ तासांपर्यंत म्युझिक playback प्रदान करू शकतो. शिवाय हा ३ बटन इनलाईन कंट्रोल सह येतो. रियलमीचं असं म्हणण आहे की रियलमी बड्स वायरलेसला फास्ट चार्ज सपोर्ट आहे आणि फक्त १० मिनिटे चार्ज केल्यावर १०० मिनिटांचा playback मिळतो.

REAL ME BUDSS WIRELESS HEADPHONES BEST IN CLASS

रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन व्हर्जन ५.० वर आधारित आहे आणि याची कनेकटीव्हीटी रेंज १० मीटर आहे त्यामुळे जुन्या मोबाईलशी सुद्धा कनेक्शन करणे सोप्पे आहे. वन प्लस बुलेटस वायरलेस २ प्रमाणे रियलमी ब्रान्डचा हा लेटेस्ट ईयरफोन सुद्धा magnetic कंट्रोल स्विच फिचर सह पूर्ण आहे. म्हणजेच या स्विच फिचर च्या मदतीने, दोन्ही ईयर बड्सना वेगळ केल असतानाही हा सुरु होऊ शकतो. कंपनीने असं म्हटलं आहे की या हेडफोनचं मटेरिअल खूपच स्किन फ्रेंडली आहे ज्यामुळे युजरला त्रास होणार नाही उलट कम्फर्टच्या बाबतीत हे रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन उत्तम आहेत.

रियलमीने ही माहिती जाहीर केली आहे की या वायरलेस ब्लूटूथ ईयरफोनला पोप्युलर DJ Alan Walker ने ट्यून केले आहे. हा वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन एका compact बॉक्स मध्ये pack करून आपल्या हाती येतो. त्यावर त्याची सगळी स्पेसिफिकेशन्स लिहिलेली आहेत आणि real sound unwired असा उल्लेख ही आहे. याचा impedance ३२ ओहम इतका आहे. स्पीकर फ़्रिक़्वेन्सि २० हर्डस ते २०००० हर्डस पर्यंत आहे.स्पीकर सेन्सिटीव्हीटी १०८ डेसिबल(DB) इतकी आहे. या बॉक्स मध्ये एक्स्ट्रा बड्स देण्यात आले आहेत. शिवाय उत्तम packing सेवा हि दिलेली आहे. सुयोग्य वापरासाठी आतमध्ये युजर गाईड दिलेला आहे. त्यावर सगळी माहिती उपलब्ध आहे. गरजेच्या सगळ्या सूचना यात समाविष्ट केलेल्या आहेत ज्यामुळे युजर ला ईयरफोन वापरणे सोप्पे जाईल. magnet वापरलेलं असल्यामुळे हे ईयरफोन एकमेकांना जोडून राहतात ज्यामुळे ते विलग होणार नाहीत. ईयरफोन बड्स मध्ये ४५ अंशाचा कोन आहे ज्यामुळे नीट ऐकू येईल आणि युजरला त्रास होणार नाही.

रियलमी पॉवर बँक –

रियलमी पॉवर बँक मध्ये १०००० एमएएच ची battery क्षमता आहे आणि हि पॉवर बँक १८ वॉट टू-वे क्वीक चार्ज सपोर्ट देत आहे. यात वेगवेगळे युएसबी टाइप-ए आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. रियलमी कडून असा दावा केला गेलाय की ही रियलमी पॉवर बँक मध्ये १२ लेअर सर्किट प्रोटेक्शन ने परिपूर्ण आहे. याशिवाय रियलमी पॉवर बँक ही स्मार्ट फोन प्रमाणेच laptop ला सुद्धा चार्ज करण्यासाठी सक्षम आहे.

REALME POWER BANKS

अशा प्रकारे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी रियलमी पॉवर बँक आणि रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.

रियलमी बड्स वायरलेस, रियलमी पॉवर बँक – किंमत आणि उपलब्धता

रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ ईयरफोनची किंमत १७९९/- रुपये आहे. ग्राहक या वायरलेस ईयरफोनला Amazon आणि रियलमीच्या Online स्टोअर वरून खरेदी करू शकतात. रियलमी ब्रांडच्या या डीव्हाइसचे ३ कलर वेरीअंट आहेत- Black, ग्रीन आणि रेड.

रियलमी पॉवर बँकची किंमत १२९९/- रुपये आहे. ही पॉवरबँक सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून फ्लिपकार्ट, Amazon आणि रियलमीच्या अधिकृत साईट वर उपलब्ध आहे.याचे ३ कलर वेरीअंट आहेत – ग्रे, रेड आणि यलो.

इथे खरेदी करा : https://www.realme.com/in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular