30 C
Mumbai
Thursday, February 2, 2023
Homeएनड्रोइडAnimated फोटोज च्या जगात Pixaloop चे नवे पाऊल..

Animated फोटोज च्या जगात Pixaloop चे नवे पाऊल..

आपल्या फोटोपासून animated व्हिडीओ किंवा gif करण्यासाठी मोबाईल वरील काही apps चा वापर केला जातो. त्यापैकी Pixaloop android app! हे app सध्या लोकप्रिय ठरत आहे. मूळ फोटोला किंवा त्यातील काही भागाला स्पेशल इफेक्ट देण्यासाठी या app चा वापर होतो. अगदी सोप्या पद्धतीने आपण आपला साधा फोटो स्पेशल करू शकतो. शिवाय एडिटिंग मुळे अनेक वेगवेगळे इफेक्ट्स देता येतात. त्यामुळे मूळ फोटोपेक्षा असे animated फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेतात. सध्याच्या  तरूणाईला आकर्षित करण्यासाठी अशी नवनवीन apps android सादर करत असत. त्यातच या नव्या app ची सध्या चर्चा आहे. सोशल मिडीयावर अनेक युजर्स लोकांचे , फेसबुक मित्रांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे app वापरून फोटो अपलोड करत आहेत त्यामुळे फारच कमी कालावधीत हे app लोकप्रिय ठरत आहे.

असे animated व्हिडीओ करण्यासाठी सगळ्यात आधी Pixaloop हे android app आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करावे लागेल. प्ले स्टोअर वरून हे app डाऊनलोड करून, इंस्टाल करून झाले कि विचारलेल्या प्रश्नांना येस/ओके असे उत्तर देऊन तुम्हाला या app ला मोबाईल मधील फोटो , व्हिडीओ इ. घेण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर हे app युजर्स च्या सेवेसाठी सिद्ध होईल.

या app चा १ आयकॉन मोबाईल स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही app मध्ये प्रवेश करू शकता. क्लिक केल्यावर समोर अनेक पर्याय दिसतील. सुरवातीला न्यू प्रोजेक्ट हा पर्याय निवडावा. त्यानंतर मोबाईलची gallery ओपन होईल आणि समोर मोबाईल मधील सगळे फोटोज दिसतील. ज्या फोटोचा animated व्हिडीओ करू इच्छीता तो फोटो सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर एडिटिंग साठी नव पेज ओपन होईल ज्यात आपण सिलेक्ट केलेला फोटो आणि अनेक पर्याय दिसतील. जर तुम्ही फोटोला animated इफेक्ट देऊ इच्छित असाल तर आधी animate वर क्लिक कराव लागेल. त्यानंतर तुम्ही २ पर्यायांचा वापर करू शकता. पाथ आणि anchor. आधी पाथ या पर्यायावर क्लिक कराव लागेल. त्यानंतर तो फोटो जास्त रंगीत झाल्यासारखा वाटेल आणि झूम करून तुम्ही डिटेल्स बघू शकता. फोटोच्या ज्या भागाला इफेकट द्यायचा आहे तो भाग सिलेक्ट करू शकता. पांढऱ्या डॉटेड लाइनने विशीष्ट भाग सिलेक्ट करून झाला कि परत फोटो झूम करून तुम्ही मिरर इमेजचा भाग सिलेक्ट करू शकता. गरज नसेल तर एखादा निवडलेला भाग काढून टाकू शकता. त्यानंतर anchor या पर्यायावर क्लिक करा म्हणजे डॉटेड लाइन दिसणार नाही आणि फोटो अनिमेशन साठी सज्ज होईल.

त्यानंतर प्ले या ऑप्शन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्या फोटोला इफेक्ट दिलेला जाणवेल. जर फोटोतील अनावश्यक भाग निवडला गेला असेल तर तो काढण्यासाठी परत anchor या पर्यायावर क्लिक करा आणि त्या भागावर क्लिक करत जा. तो अनावश्यक इफेक्ट निघून जाईल आणि ज्या भागाला इफेक्ट देऊ इच्छित होतात ते तुम्हाला समोर दिसेल. त्या व्हिडिओ इफेक्टचा स्पीड कमी जास्त करू शकता. हा animated व्हिडीओ gallery मध्ये सेव्ह करण्यासाठी सेव्ह या ऑपशन वर क्लिक करा. व्हिडीओची क्वालिटी आणि ड्यूरेशन सिलेक्ट करू शकता. सगळ्यात शेवटी एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करा म्हणजे gallery मध्ये हा व्हिडीओ इफेक्ट दिलेला फोटो सेव्ह होईल.

त्यानंतर फेसबुक , whatspp , इंस्टा अशा कोणत्याही सोशल मिडिया साईट वर हा फोटो तुम्ही अपलोड करू शकता. तर लगेच हे Pixaloop android app इंस्टाल करा आणि व्हिडीओ इफेक्ट्स चा आनंद लुटा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular