दर्जेदार स्मार्टफोन्स निर्माण करणारी चायनीज कंपनी वनप्लसने बहुप्रतीक्षित ‘वनप्लस’ टीव्ही आणि ‘वनप्लस ७ टी’ सिरीजचे २६ सप्टेंबर रोजी लौन्चींग केले आहे. तसेच या नव्या टीव्हीचा लोगोही कंपनीने प्रकाशित केला आहे. या लौन्चींग साठी २६ सप्टेंबर ही तारीख नक्की केल्याच कंपनीने आधीच जाहीर केल होत. तसेच कंपनीने या डिव्हाइसच्या फीचर्स ची माहिती जाहीर केली आहे. वनप्लस टी सिरीज मध्ये कंपनीने वनप्लस ७ टी आणि वनप्लस ७ टी प्रो लौंच केले आहेत.
वनप्लस टीव्हीचे स्पेसिफिकेशन –
वन प्लस टीव्ही मध्ये ओएलडी पॅनल नाही असं कंपनीने आधीच जाहीर केल होत. वन प्लस टीव्ही ४३,५५,६५ आणि ७५ इंच वेरीअंट मध्ये लौंच करण्यात आला आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरीअंट 4KHDR डिस्प्ले ला सपोर्ट करेल. या टीव्ही मध्ये ८ इनबिल्ड स्पिकर्स आहेत.
या स्मार्ट टीव्ही च्या नावासाठी कंपनीने एका स्पर्धेचं आयोजन केल होत. यात युजर्स कडून स्मार्ट टीव्ही साठी नावं आणि लोगोचं डिझाईन सुचवण्यासाठी आवाहन केल होत. अनेकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्याला भरघोस बक्षीसही कंपनीने जाहीर केल होत.
वन प्लस टी चे स्पेसिफिकेशन –
या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर सोबत ६.५५ इंचाचा अमोल्ड डिस्प्ले आहे. १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरीअंट आहेत. फोटोसाठी ४८ मेगा पिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगा पिक्सल टेली फोटो लेन्स आणि १६ मेगा पिक्सल कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ३८०० एम एच battery ची क्षमता आहे.
वनप्लस ७ टी प्रो चे स्पेसिफिकेशन –
या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर सोबत ६.५५ इंचाचा अमोल्ड क्युएचडी डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन कंपनीने फक्त ८ जीबी ram आणि २५६ जीबी स्टोरेज वेरीअंट मध्ये लौंच केला आहे. फोटोसाठी ४८ मेगा पिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत ८ मेगा पिक्सल टेली फोटो लेन्स आणि १६ मेगा पिक्सल कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये ४०८५ एम एच battery ची क्षमता आहे.
आता या वन प्लस टीव्हीची प्रतीक्षा संपली असून बाजारात दाखल झाला आहे. स्मार्टफोन्स मुळे नाव कमावलेल्या वनप्लस या कंपनीने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे सर्वत्र याची चर्चा आहे. इतर टीव्ही कंपन्यांशी वनप्लस नक्कीच स्पर्धा करेल.