Android युजर्स नी कृपया इकडे लक्ष द्यावे. गुगल प्ले स्टोअर च्या २४ apps वर मालवेअर हल्ला झाल्याच्या कारणामुळे android युजर्स ची चिंता वाढल्याचा एक रिपोर्ट नोंदवला गेला आहे. या रिपोर्ट नुसार गुगल प्ले स्टोअर च्या २४ apps वर मालवेअर चा हल्ला झाला आहे. यामुळे स्मार्ट फोन मधील पर्सनल माहिती लिक केली जात आहे. या जोकर नावाच्या मालवेअर ने भारतासहित दुनियाभरातल्या अनेक apps ना प्रभावित केले आहे आणि त्यावर हल्ला चढवून युजर्स ना टार्गेट केले आहे. जोकर नावाचा हा मालवेअर अतिशय धोकादायक मानला जातोय. ज्या apps वर हा मालवेअर हल्ला झाला आहे अशी apps लवकरात लवकर आपल्या स्मार्ट फोन मधून काढून टाकणे गरजेचे आहे. जर अशी apps डिलीट केली नाहीत तर ती आपल्या स्मार्ट फोन ला धोका पोचवू शकतात.
या मालवेअर चा शोध सिक्योरिटी रिसर्चर एलेक्सेज ने लावला आहे. हा मालवेअर युजर्सना सब्सक्रिप्शन सर्विस साठी स्वताहून साइन इन करून घेतो आणि युजर्स ना त्याबद्दल काही कळतही नाही. एवढच नाही तर हा मालवेअर युजर्स च्या क्रेडीट कार्ड मधील मंथली स्टेटमेंटसना सुद्धा चेक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि विचित्र गोष्ट ही आहे की या सगळ्या प्रकारामुळे युजर्सना काही महिन्यांपर्यंत विनाकारण पैसे भरावे लागू शकतात. ज्या २४ apps वर हा हल्ला झाला आहे त्या apps ना अंदाजे ५ लख वेळा गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केल गेल आहे.
ज्या apps वर मालवेअर ने इफेक्ट केला आहे त्यात
- Soby Camera 1.0.1
- Declare Message 10.02
- Display Camera 1.02
- Climate SMS 3.5
- Great VPN 2.0
- Humour Camera 1.1.5
- Print Plant scan
- Advocate Wallpaper 1.1.9
- Ruddy SMS Mod
- Ignite Clean 7.3
- Antivirus Security – Security Scan, App Lock
- Collate Face Scanner
- Beach Camera 4.2
- Mini Camera 1.0.2
- Certain Wallpaper 1.02
- Reward Clean 1.1.6
- Age Face 1.1.2
- Altar Message 1.5
- Rapid Face Scanner 10.02
- Leaf Face Scanner 1.0.3
- Board Picture editing 1.1.2
- Cute Camera 1.04
- Dazzle Wallpaper 1.0.1
- Spark Wallpaper 1.1.11
या apps वरमालवेअर ने हल्ला चढवला आहे.
जर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये यापैकी कुठलही app असेल तर त्याला लगेच डिलीट करा. याशिवाय तुम्ही हे सुद्धा चेक केल पाहिजे की तुम्ही गुगल प्ले अकौंट मध्ये कुठल्या सर्विस चं सब्सक्रिप्शन तर केल नाही ना. तुम्ही एकदा आपल क्रेडीट कार्ड आणि बँक स्टेटमेंट हेसुद्धा चेक केल पाहिजे.
हा मालवेअर ३७ देशांमध्ये प्रभावित असल्याच सांगितलं जातंय. त्यात भारत अग्रेसर आहे. त्यामुळे भारतीय स्मार्ट फोन धारकांच्या चिंतेत भर पडली आहे. मालवेअर ने प्रभावित असलेल्या असंख्य apps नी मुख्यत्त्वे करून युरोपीय आणि आशियाई देशांना टार्गेट केल आहे. रिपोर्ट नुसार अनेक देश या मालवेअर हल्ल्यामुळे चिंतेत आहेत. यात ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, चीन, साइप्रस, मिस्र, फ्रांस, जर्मनी, घाना, ग्रीस, होंडुरास, भारत, इंडोनेशिया, आयरलैंड, इटली, कुवैत, मलेशिया, म्यांमार, नेदरलैंड, नॉर्वे, पोलैंड, पोर्तगाल, कतार, अर्जेंटीना, सर्बिया, सिंगापुर, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, स्विट्जरलैंड, थाईलैंड, तुर्की, यूक्रेन, संयुक्त अरब अमीरात, यूनाइटेड किंगडम आणि संयुक्त राज्य अमेरिका अशा अनेक देशांचा समावेश आहे. या मालवेअर ला एक्झीक्युट होण्यासाठी युजर कडून सिम कार्ड वापरलं जाण्याची गरज आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी या सगळ्या apps ना प्ले स्टोअर वरून काढून टाकले आहे. हा मालवेअर युजर्सच्या प्रायव्हेट गोष्टींना हानी पोचवू शकतो आणि म्हणूनच त्याला धोकादायक म्हटले जात आहे. हा मालवेअर एसएमएस , संपर्क नोंदी, IMEI नंबर इ. स्मार्ट फोन मधून चोरतो आणि युजरला त्याबद्दल जराही कळू देत नाही. नकळत अनेक युजर्सनी या मालवेअर ला डाऊनलोड केले आहे. त्यामुळे आता वरील पैकी कोणतेही app जर दृष्टीस पडले तर ते डाऊनलोड करू नये असे आवाहन केले जात आहे. आणि यातील इंफेकटेड app रिमुव्ह केल्यानंतर आपल्या data चा backup घेऊन factory reset करावे असे सांगण्यात येत आहे.
अशा प्रकारे या मालवेअर हल्ल्यापासून बचावण्यासाठी आणि त्यापासून दूर राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. युजर्सनी सतर्क राहणे गरजेचे आहे.