33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeटेलीकॉमजिओफायबर नक्की काय देत आहे?

जिओफायबर नक्की काय देत आहे?

5 सप्टेंबर 2019 हाच तो दिवस ज्याची नेटकरी बऱ्याच दिवसा पासून वाट पाहत होते. आणि फायनली रिलायन्स ने जिओफायबर ब्रॉडबँड सर्विस भारतातील जवळपास 1600 शहारांनमध्ये सुरू केली आहे. आज आपण पाहणार आहोत की ही सेवा नक्की काय आहे आणि खरच या सेवेमुळे सध्याच्या आपल्या आयुष्यात काही बदल घडणार आहे का?

reliance jiofiber launch 5 september 2019
Reliance Jio Fiber launch – 5 september 2019

सबस्क्रिपशन प्लानस
जिओफायबर ही सेवा आपणाला जर घ्यावयाची असेल तर दर महिना तुम्हाला कमीत कमी ₹ 699 मोजवयास लागतील, कारण हाच जिओफायबरचा स्टारटिंग प्लान आहे. यात तुम्हाला 100 mbps पर्यंत चा मिनिमम स्पीड मिळेल जे खरोखर असेल तर तुम्हाला चुटकीसरशी कन्टेन्ट डाउनलोड आणि अपलोड करता येईल

सर्व नवीन ग्राहकांना ₹2500 हे security deposit म्हणून भरवयास लागतील, ज्यामध्ये ₹1000 हे इंस्टॉलशन चार्जेस असतील जे तुम्हाला परत मिळणार नाहीत

Plans
Bronze Plan
₹699/- only
100GB (अतिरिक्त 50GB फ्री)
स्पीड 100mbps

Silver Plan
₹849/- only
200GB (अतिरिक्त 200GB फ्री)
स्पीड 100mbps

Gold Plan
₹1299/- only
500GB (अतिरिक्त 250GB फ्री)
स्पीड 250mbps

Diamond Plan
₹2499/- only
1250GB (अतिरिक्त 250GB फ्री)
स्पीड 250mbps

Platimum Plan
₹3999/- only
2500GB
स्पीड 1gbps

Titanium Plan
₹8499/- only
5000GB
स्पीड 1gbps

ह्या होत्या जिओफायबर यांनी आणलेल्या schemes. खरं पाहता डिजिटल युग जे भारतामध्ये एक पाऊल पुढे नेण्याचं काम हे रिलायन्स यांनी केलं आहे दोन वर्षांपूर्वी जिओ आणून आणि आता जिओफायबर आणून. मित्रांनो तुम्हाला आणखी या बद्दल चे अपडेट्स आपण नक्कीच देत राहू, आता निघते कारण आता मलाही वेळ न दवडता ह्याच सबस्क्रिपशन घ्यायचं आहे.

-सुखदा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular