33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeस्मार्टफोन्सआयफोन 11 आता triple कॅमेरासह ! Boss is Back !

आयफोन 11 आता triple कॅमेरासह ! Boss is Back !

टेक विश्वातील दिग्गज कंपनी apple यावर्षी आपला नेक्स्ट जनरेशन iphone लौंच करेल. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कंपनी आपला नवा iphone september मध्ये जगासमोर आणत आहे. मागील अनेक दिवसांपासून apple च्या नवीन iphone ची चर्चा होती.गेल्या वर्षी कंपनीने apple iphone x हि सिरीज लौंच केली होती. apple कधीच नावाचा खुलासा करत नाही पण अनेक लिक्स मध्ये फोन ची माहिती आली होती. कंपनीने कुपरतीनो येथील आपल्या हेड क्वार्टरमध्ये एका इव्हेंट मधून नवीन iphone सादर केले. iphone 11 सोबत apple iphone प्रो आणि iphone प्रो max सदर केले आहेत.

खास बाब अशी आहे कि ग्लोबल लौंच सोबत कंपनीने या phones ची भारतीय किंमत पण जाहीर केली आहे. भारतीय बाजारात apple iphone ची बेस किंमत ६४,९००/- आहे. apple iphone प्रो साठी ९९,९००/- मोजावे लागतील तर आयफोन ११ पर्प max साठी १०९९००/- मोजावे लागतील. iphone ११ हे सर्वात लहान मॉडेल आहे. या फोन मध्ये तुम्हाला ६.१ इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. रेसोल्यूशन ८२८*१७९२ एचडी + पिक्सेल रेसोल्युशन सह फोने मध्ये १९.५:९ aspect ratio असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन scratch प्रूफ आहे आणि ओलिओफोबिक कोटिंग चा वापर करण्यात आला आहे. ios 13 operating आधारित या फोन मध्ये ७ nanometer fabrication च्या apple a13 bionic chip set चा वापर करण्यात आला आहे. जुन्या चीप सेट च्या तुलनेत हि चीप सेट खुप आधुनीक आहे असा कंपनीचा दावा आहे. या फोन मध्ये ४ जीबी RAM देण्यात आली आहे. शिवाय हा फोन ६४ जीबी , १२८ जीबी आणि २५६ जीबी मेमरी सह येतो. आयफोन ११ प्रो आणि प्रो max हे दोन्ही ६४ जीबी , २५६ जीबी आणि ५१२ जीबी मेमोरी सह येतात.

या फोन मध्ये डूअल रिअर कॅमेरा आहे. मेन सेन्सर १२ एमपी चा आहे आणि हा एफ/१.८ aperture सह येतो. दुसरा सेन्सर १२ एमपी चा आहे आणि तो ultra wide angle ला सपोर्ट करतो आणि हा एफ/२.४ aperture सह येतो. सेल्फी साठी १२ एमपी चा front कॅमेरा देण्यात आला आहे आणि त्यात स्लोमोशन विडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.

iphone ११ काळा , हिरवा पिवळा , जांभळा , पांढरा आणि लालसहित सहा रंगांमध्ये आहे. आयफोन प्रो आणि max हे दोन्ही सिल्वर , गोल्ड , मिडनाईट ग्रीन आणि ग्रे या वेगळ्या रंगात असतील. मिडनाईट ग्रीन हा नवा रंग सामील झाला आहे आणि त्याचीच सध्या क्रेझ आहे. भारतात हे फोन्स २७ september पासून विकत घेता येतील.

या फोन मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. या फोनने दुसरा फोन वायरलेस चार्ज करू शकता. जर हा ऐकीव दावा खरा ठरला तर येत्या काळात तुम्ही रिवर्स चार्जिंग फिचरचा वापर करून आपल्या iphone ने इतर apple डीव्हाइस चार्ज करू शकाल. रिपोर्ट नुसार कंपनी याय १८ watt फास्ट चार्जरचा वापर करेल.

आयफोन ११ प्रो ची स्क्रीन ५.८ इंचाची आहे तर आयफोन ११ प्रो max ची स्क्रीन ६०५ इंचाची आहे. या दोन्ही फोन्समध्ये सुपर रेटीना डिस्प्ले आणि सुपर XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.

तर आता या मोबाईलची प्रतीक्षा संपली आहे. प्रीबुकिंग १३ september पासून सुरु झाले आहे. २७ पासून विक्री सुरु होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular