हुवावे (Huawei) ने मेट सिरीजचे मेट ३० (Huawei Mate 30) आणि मेट ३० प्रो (Huawei Mate 30 pro) हे २ स्मार्ट फोन जर्मनीमध्ये लौंच केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये स्पेशल Halo Ring Design दिले आहे. ज्यात Leica Optics आहे. याशिवाय कंपनी ग्राहकांना Huawei Mate 30 आणि प्रोसह watch जीटी २ आणि फ्रीबड ३ वायरलेस ब्लूटूथ हेडफोन देत आहे. परंतु कंपनीने मेट ३० आणि मेट ३० प्रो च्या भारतातील लौंचची अधिकृत घोषणा केलेली नाही.
कंपनीने हुवावे मेट ३० च्या ८ जिबी RAM + १२८ जिबी इंटरनल स्टोरेजवाल्या वेरीअंटला ७९९ युरो (६३००० रुपये) आणि प्रो च्या ८ जिबी RAM + २५६ जिबी स्टोरेज च्या वेरीअंटला १०९९ युरो (८६७०० रुपये) या किंमतीसह सादर केले आहे. तसेच ग्राहक हुवावे मेट ३० च्या ५ जी वेरीअंटला ११९९ युरो (९४६०० रुपये) या किंमतीसह खरेदी करू शकतात. याशिवाय हुवावेने मेट ३० RS Porsche Design च्या वेरीअंटलाही लौंच केले आहे. या फोन ला १२ जीबी RAM आणि ५१२ जीबी स्टोरेजचा सपोर्ट आहे. याची किंमत २०९५ युरो(१६५३०० रुपये)आहे.
हुवावे मेट ३० चे स्पेसिफिकेशन –
- एमआययुआय १० ऑपरेटिंग सिस्टीम
- ६.६२ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले
- रिजॉल्युशन १०८० x २३४० पिक्सल
- डिस्प्ले पॅनेल मध्ये एंटी ब्लू तंत्र
- ऑक्टा-कोर हायसिलिकॉन किरीन ९९० चीपसेट
- tripple रियर कॅमेरा (४० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड angle , ८ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स )
- २४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
- कनेकटीव्हीटी- वाय-फाय , ब्लूटूथ ५.० , जीपीएस , युएसबी पोर्ट
- ४२०० एमएएच battery
हुवावे मेट ३० प्रो चे स्पेसिफिकेशन –
- एमआययुआय १० ऑपरेटिंग सिस्टीम
- ६.५३ इंच फुल एचडी प्लस फ्लेक्स ओएलईडी डिस्प्ले
- रिजॉल्युशन ११७६ x २४०० पिक्सल
- डिस्प्ले पॅनेल मध्ये एंटी ब्लू तंत्र
- ऑक्टा-कोर हायसिलिकॉन किरीन ९९० चीपसेट
- tripple रियर कॅमेरा (४० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ४० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड angle , ८ मेगापिक्सलचा ३ डी डेप्थ सेन्सर )
- ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
- कनेकटीव्हीटी- वाय-फाय , ब्लूटूथ ५.० , जीपीएस , युएसबी पोर्ट
- ४५०० एमएएच battery
अशा विविध नव्या टेक्निक सह सिद्ध असलेल्या हुवावे मेट ३० (Huawei Mate 30) आणि हुवावे मेट ३० प्रो ची आता भारतीयांना प्रतीक्षा आहे.