एचपी कंपनीने मोबाईल बिझिनेस प्रोफेशनल्स साठी एच पी इलाइट draganfly हा नवा laptop लौंच केला आहे. जो एक अल्ट्रा-लाईट प्रीमिअम convertible नोटबुक आहे. याच वजन १ किलोपेक्षा कमी आहे. यासह या laptop ला प्रीमिअम डिस्प्ले आहे आणि घर-ऑफिस साठीच्या एक्सेसरीजपेक्षाही याच वजन कमी आहे. निसर्गात आढळणाऱ्या, हवेवर स्वार होणाऱ्या draganfly च्या नावावरून कंपनीने याला “ lighter than air ” अशी उपाधी दिली आहे. कमी वजनासाठी आणि टिकण्यासाठी यात magnesium चा वापर करण्यात आला आहे. शिवाय या laptop च्या पृष्ठ भागावर ओलीओफोबिक कोटिंग देण्यात आले आहे ज्यामुळे स्लोपवर ठेवूनही तो घसरू शकणार नाही. या सगळ्या गुणधर्मांमुळे या laptop चा वापर उदासवाणा न होता आनंददायी असेल.
यात १६ जीबी RAM आणि २ टीबी पर्यंत सॉलिड-स्टेट स्टोरेज(एसएसडी ) आहे.१३ इंचाचा हा x३६० laptop २५ ऑक्टोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत १५४९ डॉलर असेल. हा laptop किंवा tablet म्हणून काम करू शकतो.
असं म्हटलं जातंय कि भारतीय बाजारात नोव्हेंबरमध्ये हा laptop लौंच केला जाईल पण स्थानिक बाजारातील त्याच्या किंमतीची घोषणा अजून केलेली नाही. हे डिव्हाइस २४.५ तासांच्या battery लाईफ आणि वायफाय ६ च्या connectivity ने परिपूर्ण आहे.
एच पी इलाइट draganfly हा जगातला पहिला असा बिझिनेस convertible आहे ज्यामध्ये बीइंग software एचपी ‘वर्कवेल’ आहे. यात ८व्या जनरेशनचा इंटेल कोअर विप्रो प्रोसेसर आहे.
युजर फ्रेंडली असा हा laptop जगातला सगळ्यात पातळ बिझिनेस convertible आहे कि ज्याचा डिस्प्ले सगळ्यात चांगला आणि curved आहे.
या laptop ला MIL – STD 810 G standard चे certificate मिळाले आहे. एका चाचणीनुसार ७६ सेमी. इतक्या उंचीवरून पडला असता या laptop ला काहीही इजा होत नाही. या laptop च्या टच स्क्रीन डिस्प्ले ला असलेल्या गोरिला ग्लास प्रोटेक्शन बद्दल कंपनीने काहीही जाहीर केलेलं नाही. एका रिपोर्ट नुसार याला काही इलेक्ट्रोनिक व्ह्यू लिमिट्स आहेत ज्यामुळे फक्त समोर बसलेल्या युजरलाच स्क्रीन वरील कंटेंट दिसू शकतो.
आता एचपी इलाइट draganfly या laptop ची भारतीय बाजारात प्रतीक्षा आहे.