जोकर मालवेअर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जगभरातील सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसवण्याचा नवीन मार्ग शोधला होता. ही पद्धत जोकर मालवेअर होती. जोकर मालवेअरबद्दल बोलायचे झाले तर, या मालवेअरने प्रभावित झालेले अॅप गुगल प्ले स्टोअरवर आढळून आले आहे. नुकतेच समोर आलेले नवीन अॅप म्हणजे कलर मेसेज. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप पाच लाखांहून अधिक डाऊनलोड झाले आहे. हे अॅप नवीन इमोजीसह तुमचा एसएमएस मजकूर पाठवणे अधिक मजेदार बनवण्याचा दावा करते.
मोबाईल सिक्युरिटी सोल्युशन्स फर्म प्रेडिओ च्या सॉफ्टवेअर अभियंतांनी संगितले, सदर अॅप जरी ग्राहकांना उत्तम अनुभव देत असली तरी देखील या अॅपवर जोकर मालवेअरवर परिणाम झाला आहे. गुगल प्ले स्टोअरवर आधीच हे अॅप प्ले स्टोअरवरुन BAN केले आहे. पण तुम्ही आधीच हे अॅप डाउनलोड केले असल्यास आपल्या मोबाइल मधील पूर्ण डाटाला धोका आहे. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर ज्यांनी हे अॅप डाउनलोड केले असेल तर तुम्हाला ते तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरुन लवकरात लवकर डिलीट करून टाका.
जोकर मालवेअर फोनवर अॅपच्या स्वरूपात इन्स्टॉल होतो. जोकर मालवेअरद्वारे अतिरिक्त ऑफर देण्याच्या बहाण्याने जगभरातील लोकांना फसवले गेले आहे. वापरकर्त्याचे बँक खाते रिकामे केले आहे. लोकांना याविषयी काहीच माहिती नसल्याचं दिसत असून त्यांना कळेपर्यंत ते चक्रावून गेले आहेत. मात्र, तुम्ही असे अॅप टाळावेत. अशा अॅप्स वापरकर्त्यांना फसवतात. अशा अॅप्सबाबत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेषत: लिंक्स किंवा फोटो, gif, व्हिडिओ इत्यादींवर क्लिक करण्यास सांगणाऱ्या अॅप्समधून !