गो प्रो या Action कॅमेरा कंपनीने गो प्रो हिरो ८ या नवीन Action कॅमेराची लौन्चींग डेट जाहीर केली आहे. येत्या १५ ऑक्टोबरला हा कॅमेरा आपल्या भेटीला येत आहे. याची किंमत ३९९ डॉलर असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. व्हिडीओ capability आणि गो प्रो स्पेशल सिग्नेचर टेक्नोलॉजी हि या कॅमेराची वैशिष्ट्य असतील असं म्हटलं जातंय.
प्रथमदर्शनी गो प्रो हिरो ८ हा Action कॅमेरा पारंपारिक डिझाईन फॉलो करेल असं दिसतंय परंतु या कॅमेराचा कायमस्वरूपी वापर करणाऱ्या युजर्सना यातील जरासा बदल नक्कीच जाणवेल. कंपनीने या कॅमेरा बॉडीमध्ये फोल्डिंग फिंगर्स हि नवीन सिस्टीम आणली आहे. म्हणजेच सगळ्या accesories आता डायरेक्टली कॅमेराला जोडता येतील. दुसऱ्या केज ची गरज पडणार नाही.
या कंपनीच्या नव्या फीचर्स पैकी हे १ इनोव्हेटिव्ह फिचर असल्यामुळे त्यामुळे कॅमेराच्या वापरावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. ही फोल्डिंग फिंगर्स रेप्लेसेबल आहेत म्हणजेच आपण स्वतः बेस्पोक माउंट च्या मदतीने ही बदलू शकतो. यामुळे हि सिस्टीम व्हर्सटाइल राहण्यास मदत होईल. या कॅमेरा बाबत आणखी १ माहिती म्हणजे याचे बॉडीवेट १४% नी कमी करण्यात आले आहे. आधीच्या कॅमेरापेक्षा हे मॉडेल हलके असल्यामुळे युजरला अधिक आनंद मिळू शकतो.
या कॅमेराच्या आतील बाजूस ८ मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो ४K(३८४० X २१६०)एवढ फुटेज ६०, ५०, ३०, २५ आणि २४ FPS सह १६:९ च्या रेशो ने रेकॉर्ड करू शकतो. तसेच ४:३ या रेशोने ३०, २५, २४ FPS सह ४ K फुटेज रेकॉर्ड करू शकतो. १०० FPS capability ने स्लो मोशन इफेक्टसुद्धा देता येईल.
१०८० p , ९६० p, किंवा ७२० p या रिजोल्युशन ने २४० किंवा २०० FPSसह सुपर स्लो मोशन मुव्हीज सुद्धा रेकॉर्ड करता येतील.
यामध्ये चार वेगवेगळ्या फोकल लेन्थच्या लेन्स वापरलेल्या आहेत. वाइड आणि लिनिअर या दोन पर्यायांमध्ये फोकल रेंज उपलब्ध आहेत. या कॅमेराचे आणखी १ वैशिष्ट्य म्हणजे यात स्पीड आणि अस्पेक्ट रेशो यात बदल करता येईल. या कॅमेरामध्ये हायपर स्मूथ २.० ही stabilization टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ही एक Advanced इमेज टेक्नोलॉजी आहे जी गो प्रो हिरो ७ या कॅमेरामध्ये पहिल्यांदा वापरली गेली होती. कन्टेटच्या फुटेज चे परीक्षण करून फ्रेम Matching ची प्रक्रिया करणे हे हायपरस्मूथ चे प्रमुख कार्य आहे.
Liveburst मोड हे नवे फिचर यात वापरले गेले आहे. यामुळे शटर हिट केल्या आधी आणि नंतर प्रत्येकी १.५ सेकंदाच्या अवधीचे फुटेज मिळणार आहे. या कॅमेराचे आणखी १ वैशिष्ट्य म्हणजे यात Night लाप्से व्हिडीओ मोड दिलेला आहे. यामुळे कमी रात्रीच्या प्रकाशामध्येही आपण हा कॅमेरा वापरू शकतो.
या आधीच्या मोडेल्स प्रमाणे गो प्रो हिरो ८ सुद्द्धा वॉटरप्रूफ आहे. १०८० p इतक्या रिजोल्युशनने या कॅमेरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करता येईल. अशा प्रकारे या कॅमेरामध्ये अनेक सिग्नेचर फीचर्स आहेत ज्यामुळे हा कॅमेरा अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे.