फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग app आपल्या युजर्स साठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक कडून एक खुशखबर आहे कारण फेसबुकने एक नवे म्युझिक प्रोडक्ट लौंच केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या म्युझिक प्रोडक्ट च्या मदतीने युजर्स गाण्याच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करू शकतात. तसेच फेसबुक स्टोरी किंवा प्रोफाईल म्हणूनही गाणे ऐकवता येईल. इंस्टाग्रामवर स्तोरीमध्ये म्युझिक स्टिकर्स, लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
सोशल मिडिया paltformने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रोडक्टच्या मदतीने युजर्स बॉलिवूडची लोकप्रिय गाणी फेसबुक , इंस्टा स्टोरीमध्ये वापरू शकतात. फेसबुकच हे प्रोडक्ट ५५ देशांमध्ये उपलब्ध आहे. या प्रोडक्टमुळे युजर्सना गाण्याच्या माध्यमातून अनेकांशी कनेक्ट होता येईल तसेच आपल्या भावना व्यक्त करता येतील. हाच कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
या प्रोडक्टसाठी भारतीय म्युझिक कम्युनिटीसोबत पार्टनरशिप करण्यात आली आहे. फेसबुकने युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी हे प्रोडक्ट तयार केले आहे. फेसबुक आणखी एका मेसेजिंग app वर काम करत आहे. यामुळे युजर्सना आपल्या मित्रमैत्रीणींसोबत अधिक गोष्टी शेअर करता येतील. थ्रेड असं या app चं नाव असून फेसबुक इंस्टाग्रामसाठी हे app आणण्याच्या तयारीत आहे.
इंस्टाग्रामावरील थ्रेड या app च्या मदतीने क्लोज फ्रेन्डशिप असलेल्या लोकांसोबत लोकेशन , स्पीड आणि battery लाईफ शेअर करण्यासाठी इन्व्हाईट करता येणार आहे. तसेच इंस्टाग्रामच्या क्रिएटिव्ह टूल्सच्या मदतीने ऑटोमेटीकली टेक्स्ट , फोटो आणि व्हिडिओ मेसेजसारख्या सोशल मिडिया पोस्ट शेअर करता येणार आहेत.
फेसबुकवर अनेक फीचर्स आहेत पण युजर्सना त्याबाबत जास्ती माहिती नाही. फेसबुकवर फ्रेंडलिस्ट नावच फिचर असून या फिचर च्या मदतीने युजर आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतो. वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय असल्यामुळे हे युजर्सना फायदेशीर ठरणार आहे. यामुळे संभाषणामधील गंमत अजून वाढेल असा दावा करण्यात येत आहे. या नव्या फिचरमुळे नव्या फ्रेंड लिस्ट मधल्या लोकांनाच पोस्ट दिसू शकतील आणि शेअर करता येतील.