भारतात ड्रोनच्या वापरासाठी अनेक नियम होते. परंतु गेल्या वर्षी त्यातील अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे निर्बंध लावण्यात आले होते.
ड्रोन उडव्ण्यासाठीचे नियम –
- भारतात १ डिसेंबर २०१८ पासून ड्रोन उडवण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. मात्र त्यासाठी DGCA कडे काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. ड्रोनसाठी युनिक identification नंबर ची गरज लागणार आहे. त्यासाठी एअरक्राफ्ट ऑपरेटर परवाना घ्यावा लागेल.
- जर तुमच्याकडे ड्रोन आहे तर तो उडवण्यासाठी तुम्हाला DGCA ची परवानगी घ्यावीच लागेल.
- जर तुमच्याकडे मायक्रो ड्रोन असेल आणि तो तुम्हाला २०० फुटांच्या खाली उडवायचा असेल तर २४ तासांपूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागेल. जर ड्रोन सरकारी एजन्सीचा असेल तर तो उडवण्यापुर्वी स्थानिक पोलीस स्थानकाला तशा सूचना द्याव्या लागतील.
- ड्रोन ऑपरेटरने वयाची किमान १८ वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजेत.
- ड्रोन ऑपरेटरने इंग्रजी हा विषय घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. तसेच ड्रोन ऑपरेटिंग साठी ट्रेनिंग पूर्ण झालेले गरजेचे आहे.
- या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यालाच DGCA कडून परवाना देण्यात येईल. ज्यासाठी कागदांची पूर्तता करावी लागेल. DGCA च्या परवान्याची वैधता ५ वर्षांची असेल, दर पाच वर्षांनी परवान्याचे नुतनीकरण करणे अनिवार्य आहे.
- ड्रोनचा विमा उतरवलेला असावा. तसेच ड्रोन उडवण्यास्ठी DGCA ने जी वेळेची मर्यादा घालून दिली आहे त्या वेळेतच ड्रोन उडवावा लागेल.
- दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू या शहरातील विमानतळाच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवता येणार नाही. इतर शहरातील ३ किलोमीटरच्या परिसरात ड्रोन उडवता येणार नाही.
- आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ २५ किमीच्या भागात ड्रोन उडवता येणार नाही.
DGCA ने ड्रोनची पाच विभागात विभागणी केली आहे. पहिला आहे nano ड्रोन ज्याचे वजन २५० ग्राम असते.दुसरा आहे मायक्रो ड्रोन , ज्याच वजन २५० ग्राम पासून २ किलोपर्यंत आहे. बाकी ३ लहान, मध्यम आणि मोठ्या साइजचे असतात ज्यांचे वजन २ किलोपासून १५० किलोपर्यंत आहे.
छोटी-मोठी ड्रोन विमाने उडवल्यानंतर हे किती आधुनिक आणि अनोखे तंत्रज्ञान आहे याची जाणीव होते. ड्रोन केवळ एक शस्त्रच नाही. ज्याप्रमाणे इंटरनेट तुमच्या मेंदूला चालना देतो त्याचप्रमाणे ड्रोन तुमच्या शरीर आणि इंद्रियांच्या क्षमतेचा विस्तार करते. स्मार्ट फोन, थ्रीडी प्रिंटिंगसोबतच ड्रोन मागील दहा वर्षांत नव्याने उदयाला आलेले पर्यायी तंत्रज्ञान आहे. ड्रोनने अमेरिकी सैन्याचे रुपडे पालटले आहे. दहा वर्षांपूर्वी अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनच्या ताफ्यात ५० ड्रोन होती. आता ७५०० आहेत. सैन्याने अफगाणिस्तानात २०१२ पूर्वीच्या ११ महिन्यांत ४४७ ड्रोन हल्ले केले होते. २०११ मध्ये यांची संख्या २९४ होती. ओबामा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर ३०० गुप्त ड्रोन हल्ले केले. ड्रोन नेहमीच युद्धभूमीवर तैनात असते. ते आपली गुप्त माहिती जमवते आणि त्वरित कारवाई करते. त्याने युद्ध पद्धतीच बदलली आहे. ते आता असैनिक क्षेत्रातील बदलांसाठी तयार आहे.
वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए)ला मनुष्यविरहित हवाई वाहन म्हणजेच ड्रोनला नागरी विमान घडामोडींशी जोडण्याचे आदेश दिले. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याचा वापर करतील. शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून शेताची निगा राखतील. बिल्डर कन्स्ट्रक्शन साइटचे सर्वेक्षण करतील. चित्रपट निर्माण क्षेत्रात त्याचा वापर होईल. हे छंदी लोकांनाही उपयोगी पडेल. ड्रोन अत्यंत शक्तिशाली, विध्वंसक तंत्रज्ञान आहे. हे जिथे जाते तिथे नवीन नियम लिहिते.