भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी नवीन प्लानची घोषणा केली आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त डेटाचे फायदे मिळणार आहेत. ज्या ठिकाणी कंपनीचे ४ जी नेटवर्क आहे त्या परिसरात २ नवीन विशेष टेरिफ वौचर्स कंपनीने जाहीर केली आहेत.
बिएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एसटीव्ही ९६चा प्लान लाँच केला आहे. याची वैधता २८ दिवस आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १०जीबी डेटा मिळणार आहे. ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे, अशाच ठराविक ठिकाणांसाठी हा प्लान उपलब्ध आहे. बीएसएनएलचे ४जी नेटवर्क सध्यातरी फक्त महाराष्ट्रातील अकोला, बीड, जालना, उस्मानाबाद आणि आसपासच्या क्षेत्रात अॅक्टिव्ह आहे. खरं पाहता, या प्लानमध्ये फक्त डेटाचे फायदे आहेत, याशिवाय टॉकटॉइम एसएमएससारख्या सुविधांचा यात समावेश नाही.
कंपनीने आपल्या ४जी ग्राहकांसाठी एसटीव्ही २३६ रुपयांचा प्लानही लाँच केला आहे. ज्यात ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज १०जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. कंपनीने आपल्या ४जी नेटवर्कच्या प्रसारासाठी हे दोन्ही प्लान लाँच केले आहेत. या प्लानच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे त्या ठिकणच्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा मानस आहे.
यासोबतच बीएसएनएलने काही व्हॉइस बेस्ड एसटीव्हीजही लाँच केले आहेत. याद्वारे डेटा-बेस्ड एसटीव्हीज अधिकाधिक वाढवण्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफरही आणली आहे. ज्यात ग्राहकांना दररोजच्या सामान्य डेटा मर्यादेसोबतच २.२ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
टेलीकॉम सेक्टर मधील सगळ्यात मोठी कंपनी झाल्यानंतर जिओने जिओ फायबर सुविधा ५ सप्टेंबरपासून सुरु केली आहे. यामुळे बिएसएनएलचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बिएसएनएलनेहे पाऊल उचलले आहे.
शिवाय BSNL ब्रॉ़डबॅंड सर्व्हिसमध्ये आपल्या यूझर्सला ७७७ रूपयांपासून १६ हजार ९९९ रूपयांपर्यंतचे प्लान ऑफर केले आहेत. बीएसएनएलचा बेसिक प्लान 50Mbps चा स्पीड उपलब्ध केला आहे, परंतू यात 500GB डेटाची लिमिट आहे. १ हजार २७७ रुपयाच्या प्लान 100Mbps च्या स्पीडसोबत 750GB डेटा दिला जाणार आहे.
जिओ , एअरटेलशी स्पर्धा करत बिएसएनएल आपले अस्तित्व सिद्ध करू पाहत आहे.