33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeकॉम्प्यूटरसआसुस विवोबूक X Series चे laptop आत्ता भारतामध्ये !

आसुस विवोबूक X Series चे laptop आत्ता भारतामध्ये !

विवोबूक १४X४१२ एफ जे च्या लौन्चींगनंतर दोनच महिन्यात आसुसने ३ नवे laptops umbrella या नावाखाली जाहीर केले आहेत.  x४०३ , x४०९ , x५०९ हे तीन नवे laptops लवकरच दाखल होतील. online आणि offline उपलब्ध असलेल्या विवोबूक रेंजची किंमत ३०९९९/- इतकी आहे. हे तिन्ही laptops ८व्या जनरेशन कोअर प्रोसेसरचे आहेत तसेच फिंगर प्रिंट स्कॅनर आणि USB type C port  ही नवी फीचर्स समाविष्ट आहेत.

आसुस विवोबूक १४ x४०३ –

तिन्हीतला हा प्रकार सर्वात महत्त्वपूर्ण म्हटला जात आहे. 8th Gen core i5 CPU आणि 8 जिबी RAM हि याची वैशिष्ट्य आहेत. यात केवळ एकच CPU पर्याय उपलब्ध आहे आणि RAM उपग्रेड होऊ शकत नाही. ५१२ जीबी PCle NVMe solid state drive मुळे उत्तम स्टोरेज आहे म्हणून अतिरिक्त ड्राईव्ह जोडू शकत नाही. १.३ किलो वजन असणा-या या laptop ला ७२ Wh Quad Cell lithium ion polymer battery आहे  आसुसचा असा दावा आहे कि सिंगल चार्जिंगवर या  batteryचं आयुष्य २४ तासाचं असेल. Mattee finish चा टच असलेली १४ इंच full Hd IPS LCD panel अशी याची स्क्रीन आहे. या laptopची किंमत ५४९९०/- असून तो सिल्वर ब्लू या रंगात उपलब्ध आहे.

आसुस विवोबूक १४ x४०९ –

१४ इंच HD स्क्रीन  असलेल्या या laptopला एंट्रीलेव्हल laptop म्हटले जात आहे. इंटेल 8th Gen core i5 CPU किंवा इंटेल 7th Gen core i3 CPU चा सपोर्ट आणि १२ जिबी RAM हि याची वैशिष्ट्य आहेत. ५१२ जीबी PCle NVMe solid state drive मुळे उत्तम स्टोरेज आहे शिवाय १ टीबीपर्यंत २.५ इंचाची हार्ड ड्राईव्ह जोडू शकतो. १.६ किलो वजन असणा-या या laptop ला ३२ Wh Dual Cell lithium ion polymer battery आहे. Mattee finish चा टच असलेली १४ इंच full Hd IPS LCD panel अशी याची स्क्रीन आहे. Nvidia GeForce MX२३० हे ग्राफिक्स कार्ड ग्राफिक्स प्रोसेसिंग साठी वापरण्यात आले आहे. या laptopची किंमत 3२९९०/- असून तो पारदर्शी सिल्वर आणि स्लेट ग्रे या रंगामध्ये उपलब्ध आहे.

आसुस विवोबूक १४ x५०९ –

x५०९ हे खर तर x४०९ चे १५ इंची व्हर्जन आहे. १५.६ इंचाचा full HD डिस्प्ले आणि कीबोर्ड वरील नंबर पॅड हि याची वैशिष्ट्य आहेत. बाकी स्पेसीफिकेशन x४०९ सारखी असली तरी एक जास्तीचा CPU पर्याय म्हणजेच इंटेल 8th Gen core i7  हा देण्यात आला आहे. १.९ किलो वजन असणा-या या laptop ला ३२ Wh Dual Cell lithium ion polymer battery आहे.  या laptopची किंमत 3०९९०/- असून तो पारदर्शी सिल्वर आणि स्लेट ग्रे या रंगामध्ये उपलब्ध आहे.

आसुस इंडियाच्या रिपोर्ट नुसार आसुस विवोबूक x४०३ या laptopला MIL STD 810G हे डूराबीलीटी आणि टफनेस साठीचे certificate मिळाले आहे. WINDOWS 10 ही सिस्टीम तिन्ही laptops वर इंस्टाल केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular