30 C
Mumbai
Thursday, February 2, 2023
Homeएनड्रोइडAndroid 9 Pie बद्दल सर्व काही..

Android 9 Pie बद्दल सर्व काही..

गुगलच्या सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन Operating System Android ची नवी आवृत्ती Android 9 Pie सदर करण्यात आली आहे. गुगल नेहमी android व्हार्जन्स्ची नावं अनुक्रमे डेसर्ट्सवरून ठेवत असतं जसं की, कपकेक, डोनट, फ्रोयो (2.0), जिंजरब्रेड (2.3), ह्नीकोंब (3.0),आईस्क्रीम sandwitch (4.0), जेलीबीन (4.1), किटकॅट (4.4), लॉलीपॉप (5.0), मार्शमेलो (6.0), नुगट (7.0), ओरीओ (8.0) आणि आता नववं व्हर्जन पाय (Pie) हा एक पेस्ट्रीमध्ये फळे/भाज्या यांच मिश्रण करून बनवलेला पदार्थ आहे!

Android 9 Pie आता पूर्ण डेव्हलप झालं असून गुगलच्या पिक्सल फोन्सवर उपलब्ध झालं आहे. गुगलचे सर्व ओएस अपडेट प्रथम त्यांच्याच नेक्सस फोन्सवर मिळायचे ते आता पिक्सलवर उपलब्ध झाले आहेत.

Android 9 Pie

Android 9 Pie या नव्या अपडेट डिझाईनमध्ये काही बदल, नवा नोटिफिकेशन panel, रिसेंटसाठी नवी स्क्रीन, नवे पर्याय आणि सोबत इतर अनेक बदलही करून देण्यात आले आहेत. नॉच म्हणजे नव्या पूर्ण डिस्प्लेने व्यापणाऱ्या फोन्ससाठी अँड्रॉइडतर्फे सपोर्ट देण्यात येणार असून AI (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून adaptive battery सिस्टीम मिळेल, ऑटो ब्राईटनेससाठी नवा अल्गोरिदम आणि CPU बॅकग्राऊंड प्रोसेस यांसाठी नवे सुधारित पर्याय आले आहेत.

Android 9 Pie मधील नवी फीचर्स :

  • Adaptive battery : एका चार्जवर फोन आता अधिक काळ चालेल. तुमच्या वापरानुसार हे तंत्र स्वत: शिकून सुधारणा करेल आणि पर्यायाने आपल्या फोनची बॅटरी लाईफ वाढेल.
  • Slices : आपल्या आवडत्या अॅपचा काही भाग आपण सर्च करताच आपल्या समोर येईल.
  • Intuitive Navigation : आता बटणांऐवजी स्वाईप करण्याच्या कृतीने अॅप्स उघडता येतील.
  • Dashboard : आपण कोणत्या अॅपमध्ये किती वेळ घालवत आहोत हे पाहता येणार.
  • App Timers : यामुळे आपल्याला अॅप्ससाठी वेळ लावून ठेवता येईल , त्यापलीकडे आपल्याला अॅप वापरताना आयकॉन्स करड्या रंगात बदलतील जेणेकरून आपला फोन वापरण्यावर ताबा राहील.
    वरील दोन सोयी Digital Wellbeing For Android चा भाग असून यामुळे लोकांचं फोनच्या अति वापरावर नियंत्रण राहील.
  • Adaptive Brightness : यामुळे फोन स्वतः कधी किती ब्राईटनेस ठेवायची ते स्वतः शिकेल.
  • Multi-camera support : आता एकापेक्षा अधिक कॅमेरे एकाच वेळी वापरता येतील! शिवाय आता USB द्वारे बाहेरून कॅमेरा जोडण्याची सोया सुद्धा काही फोन्सना देण्यात येणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular