33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeइलेक्ट्रोनिक्सएमेझॉन चा नवीन इको शो 5, डिजिटल अलार्म क्लॉक आणि बरच काही...

एमेझॉन चा नवीन इको शो 5, डिजिटल अलार्म क्लॉक आणि बरच काही ?

आता एमेझॉन ने फक्त 9000 रुपयात त्याचा अलेक्सा प्रणित नवीन डिव्हाइस सादर केला आहे, ज्याच नाव आहे इको शो 5. हा खर पाहता एक स्मार्ट डिस्प्ले स्पीकर आहे. याची स्क्रीन साईझ 5.5″ आहे. हा एवढा कॉम्पॅक्ट आहे की तो तुमच्या बेडरूम मध्ये उशिजवळ कसाही फिट होऊ शकतो. ज्याचा उपयोग तुम्ही अगदी अलार्म क्लॉक म्हणून करू शकता.

डिसाइन पाहता हा डिस्प्ले स्पीकर अगदी रिजिड आणि फर्म आहे. ह्यात 2 मायक्रोफोन दिले गेले आहेत. याच्या पाठीमागे मायक्रो usb आणि ऑक्सिलरी पॉईंट चा सपोर्ट दिला आहे. पुढच्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला वरती 1 मेगा पिक्सेल चा कॅमेरा दिला आहे, जो तुम्ही मॅन्युअल मोड ने लपवू शकता जर नको असेल तर.

जेव्हा तुम्ही नेट शी कनेक्ट कराल तेव्हा तुम्ही OTT सेवांचा लाभ घेऊ शकाल. आणि त्यासाठी तुम्ही टचस्क्रीन वापरू शकता किव्हा फक्त अलेक्सा ला व्हॉइस कमांड देऊन या सर्व गोष्टी वापरू शकता. आत तुम्ही जर अमेझॉन चे प्राईम मेंबर असाल तर ऍमेझॉन च्या OTT सेवा तूमचा experience हा नेक्स्ट लेवल होऊन जाईल.

या व्यतिरिक्त तुम्ही जर स्मार्ट होम शी कनेक्ट असाल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व स्मार्ट स्वयंसंचालीत डिव्हाइसेस इको ला कनेक्ट करू शकाल. जर मला विचाराल तर 9000 रुपयांमध्ये हा इको 5 प्रॉडक्ट घेणे म्हणजे तुम्ही तेवढे टेकसेव्ही असले पाहिजे. नाहीतर थोडा धीर धरा दिवाळी मध्ये काही चांगल्या ऑफर्स येतील तेव्हा सेल मध्ये तुम्हाला हा प्रॉडक्ट कमी किमतीत मिळून जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular